मुंबई : राज्यभरात डेंग्युने थैमान घातलं असून, आतापर्यंत ३ हजार ५६५ रूग्ण आढळले. तसंच राज्यभरात ३१ हजार २०१ डेंग्यू सदृश्य रूग्णांची तपासणीही करण्यात आली. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत २४ रूग्णांचा डेंग्युने मृत्यू ओढवला आहे.
मुंबईकरांसाठी आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी, केईएममध्ये तीन डॉक्टर्सना डेंग्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येतेय. डॉ. वृज दुर्वे, डॉ. शशी यादव, आणि डॉ. अरविंद सिंग या तीन डॉक्टर्सना डेंग्यू झालाय. त्यापैकी दोन डॉक्टर्सवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर एका डॉक्टरवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
गेल्याच आठवड्यात केईएममधल्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. मुंबईत वर्षभरात जवळपास साडे सहाशे जणांना डेंग्यूची लागण झालीय, तर ९ जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मुंबईकरांनो, डेंग्यूपासून सावध राहा आणि स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.