मुंबई : पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्यानं महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर तसंच महापालिका यंत्रणेवर जोरदार टीका होतेय.
उद्धव ठाकरेंनी मात्र मुंबई महापालिकेची पाठराखण केलीय. दोष देणारे दोषच देणार... पालिकेला दोष देणं सोपं आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. मुंबईची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे की, समुद्रातलं पाणी उलटं मुंबईत येतं. ओहोटी येत नाही तोपर्यंत पंपिंग स्टेशनच्या तीन गेटपैकी एका गेटमध्ये अडकलेला दगड काढता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेची स्थापना सेवा करण्यासाठी झालीय. त्यामुळं कोसळत्या पावसात वर्धापन दिन साजरा करू नका, असं आवाहन देखील त्यांनी शिवसैनिकांना केलंय.
दरम्यान, पंधरा दिवसांतला पाऊस एका दिवसात झाला असं सांगत मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी आपली जबाबदारी झटकलीय. आज रात्री समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा मेहता यांनी दिलाय. तसंच उद्या मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.