मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. मात्र यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. यावरून उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेणे टाळले असल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरे येथून पाच मिनिटाच्या महापौर बंगल्यावर त्यावेळी होते, शरद पवारांनी उद्धव यांची दहा मिनिटे वाट बघितली असल्याचंही सांगण्यात येत आहे, तरीही उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला का आले नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यात भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची सर्वात जास्त गरज असतांना, पवारांनी अपेक्षित नसलेला पाठिंबा भाजपला देऊ केला. याचा मोठा परिणाम शिवसेना-भाजपच्या वाटाघाटीवर झाला. याचा राग उद्धव ठाकरे यांना असेल का असा सवाल केला जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.