मुंबई : सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार पाठिंबा दर्शवलाय. भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचा उल्लेख केला होता.
भागवतांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच भूमिका मांडल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितंलय. भारत हिंदू राष्ट्रच असून त्यासाठी कुणाच्या अनुमतीची गरज नसल्याचंही उद्धव यांनी स्पष्ट केलंय.
भारत हे हिंदू राष्ट्र असून हिंदू हिच भारताची ओळख असल्याचं वक्तव्य काल सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे आता 'हिंदू राष्ट्रा'वरून राजकारण तापलेले दिसत आहे. बाळासाहेबांचाच विचार भागवतांनी मांडला आहे. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, असे उद्धव यावेळी म्हणालेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक असलेले मोहन भागवत यांच्या हिंदुत्ववादी धोरणाचा बंगळुरू येथे युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत प्रदर्शन केलं.
आरएसएस प्रमुख भागवतांनी रविवारी एका सभेत बोलताना पुन्हा एकदा भारत हे हिंदू राष्ट्र असून, हिंदूत्व हीच भारताची ओळख आहे. तसंच अनेक समाजांना हिंदू आपल्यात सामावून घेऊ शकतात, असं वक्तव्य केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.