वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना वि. राणे सामना!

वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना आव्हान देणार आहेत काँग्रेसचे नारायण राणे... सावंत विरूद्ध राणे नव्हे, तर राणे विरूद्ध शिवसेना असा आमनासामना ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात रंगणाराय.

Updated: Mar 23, 2015, 11:14 PM IST
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना वि. राणे सामना! title=

मुंबई: वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना आव्हान देणार आहेत काँग्रेसचे नारायण राणे... सावंत विरूद्ध राणे नव्हे, तर राणे विरूद्ध शिवसेना असा आमनासामना ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात रंगणाराय.

गद्दाराला धडा शिकविण्याचं काम शिवसैनिक करेल - वैभव नाईक

कुडाळमध्ये जे घडलं, त्याचीच पुनरावृत्ती वांद्र्यात व्हावी, यासाठी शिवसेनेनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. कुडाळमध्ये शिवसेनेच्या वैभव नाईकांनी नारायण राणेंना पराभवाचं पाणी पाजलं. सोमवारी वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेच्या तृप्ती सावंतांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा हेच वैभव नाईक तिथं आवर्जून उपस्थित होते.  पराभवामुळं डिवचल्या गेलेल्या नारायण राणेंनी आता राजकीय फासे टाकलेत ते थेट मातोश्रीच्या अंगणात... ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात... त्यामुळंच राणेंना पुन्हा एकदा चारी मुंड्या चीत करण्यासाठी शिवसेनेनंही दंड थोपटलेत.

शिवसेना विरूद्ध राणे या तुंबळ युद्धात सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या बाजूनं मैदानात उतरणाराय. वांद्र्यातील पोटनिवडणूक ही महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची असणाराय... नारायण राणेंच्या विरोधात एकट्या तृप्ती सावंत नाही, तर अख्खी शिवसेनाच उभी ठाकणार आहे. त्यादृष्टीनं शिवसेनेनं ही निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा केलाय, तर नारायण राणेंसाठीही असणाराय ही अस्तित्वाची लढाई.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.