व्हिडिओ व्हायरल : एअर इंडियाची प्रवाशांशी असंवेदनशील वागणूक

एअर इंडियाची प्रवाशांना वाईट वागणूक दिल्याने संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर या वागणुकीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Updated: Feb 17, 2015, 03:03 PM IST
व्हिडिओ व्हायरल : एअर इंडियाची प्रवाशांशी असंवेदनशील वागणूक   title=

मुंबई : एअर इंडियाची प्रवाशांना वाईट वागणूक दिल्याने संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर या वागणुकीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, तुम्ही उशीरा आल्यास तुमचे तिकीट गमावता, असेही एका अधिकाऱ्याने प्रवाशांना उद्देशून म्हटल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. 

या व्हिडिओत एअर इंडियाचे कर्मचारी प्रवाशांना वाईट वागणूक देत असल्याचे समोर आले आहे. शिवेंद्र नामदेव यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ अप केलाय. त्यामुळे एअर इंडियाची ही वृत्ती सर्वांसमोर आलेय.

एअर इंडियाकडून आलेल्या संदेशाप्रमाणे प्रवाशांनी विमानाच्या उड्डाणापूर्वी ४५ मिनिटांपूर्वी विमानतळावर हजर राहणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही ५५ मिनिटांपूर्वीच विमानतळावर हजर होतो. मात्र, तेव्हा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी ६० मिनिटे अगोदर हजर रहाणे बंधनकारक आहे, असे सांगत आम्हाला विमानप्रवासास मनाई केल्याचे शिवेंद्र नामदेव यांनी फेसबुकवर म्हटले आहे. 

तसेच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी आमचे म्हणणेही ऐकून घेण्यास नकार दिला. तसे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी रडत असून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना विमानात जाऊ देण्यासाठी गयावया करत असल्याचे दिसते. मात्र, तरीही कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलपणा दाखवत तुमच्या भावनांना आवर घाला, असे माफक उत्तर त्या मुलीला दिले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.