मरीन ड्राईव्हपेक्षा ३ पट मोठा मरीन ड्राईव्ह विकसित करणार

मुंबईतील पश्चिम किनारपट्टीप्रमाणे पूर्व किनारपट्टी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 17, 2017, 04:30 PM IST
मरीन ड्राईव्हपेक्षा ३ पट मोठा मरीन ड्राईव्ह विकसित करणार title=

मुंबई : (दीपक भातुसे) मुंबईतील पश्चिम किनारपट्टीप्रमाणे पूर्व किनारपट्टी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. बीपीटीमधील ७५० हेक्टर जागा विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली महत्वाचे मुद्दे
१) सध्याच्या मारिन ड्राईव्हपेक्षा तीन पट मोठा मरीन ड्राईव्ह विकसित करणार
२) दुबईतील बुर्ज खलिफासारखी उंच इमारत बांधण्याचा प्रस्ताव
३) पर्यटनच्या दृष्टिकोनातून पूर्व किनारपट्टीचा विकास करणार
४) कन्व्हेंशन सेंटर, हाॅटेल्य, बीपीटीची कार्यालये या परिसरात असणार
५) केंद्र सरकार स्वत: याचा विकास करणार असून १०० टक्के खर्च केंद्र करणार
६) केंद्रीय मंत्रिमंडळाची टिपण्णी तयार
७) लवकरच मंजूरी मिळण्याची शक्यता
८)  महाराष्ट्र सरकारचे सहकार्य घेणार