आशिष शेलार कोण?, मंत्री राठोड यांची तक्रार रास्त - सुभाष देसाई

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कालच्या वक्तव्याचा उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी चांगलाच समाचार घेतलाय. युतीबाबत निर्णय घेणारे आशिष शेलार कोण आहेत असा सवाल देसाईंनी केलाय. तसंच युती ठरवण्याएवढे शेलार हे ज्येष्ठ नेते नसल्याचाही टोला त्यांनी लगावलाय. 

Updated: Feb 11, 2015, 02:54 PM IST
आशिष शेलार कोण?, मंत्री राठोड यांची तक्रार रास्त - सुभाष देसाई title=

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कालच्या वक्तव्याचा उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी चांगलाच समाचार घेतलाय. युतीबाबत निर्णय घेणारे आशिष शेलार कोण आहेत असा सवाल देसाईंनी केलाय. तसंच युती ठरवण्याएवढे शेलार हे ज्येष्ठ नेते नसल्याचाही टोला त्यांनी लगावलाय. 

देसाईंच्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमधला वाद चिघळण्यात शक्यता आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची तक्रार रास्त असल्याचंही सुभाष देसाई यांनी म्हटलंय.  राज्यामंत्र्यांच्या अधिकारांच्या निमित्तानं शिवसेना-भाजपमधील धुसपूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलीय. शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी अचानक बंडाचा पवित्रा घेतलाय. संजड राठोड हे महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर यांच्यावर नाराज आहेत. 

खडसे पुरेसे अधिकार देत नसल्याची तक्रार संजय राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केलीय. यासंदर्भात त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय. हीच परिस्थिती कायम राहिल्यास राठोड राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं समजतंय. तर दसुरीकडे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची नाराजी योग्य नसल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलीय. राठोड यांना यापूर्वीच अधिकार दिलेले आहेत. मात्र त्यांना अजून अधिकार हवे असल्याचा दावा खडसेंनी केलाय. 

तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना दोन दिवस थांबण्याचा सबुरीचा सल्ला दिलाय. दोन दिवसांत निर्णय घेण्याचं सांगत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गर्भित इशारा दिल्याचं समजतंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना भाजपला लक्ष्य करण्याची संधी सोडलेली नाही. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झालाय. आता शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांच्या अधिकारांवरून पुन्हा दोन्ही पक्षांत जुंपण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.