लोकलनं प्रवास करणा-या महिलांना कशाची भीती वाटते?

मुंबई लोकलनं प्रवास करणा-या महिलांना नेमकी कशाची भीती वाटते, हे एका एनजीओनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय. या सर्वेक्षणातले निष्कर्ष पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. 

Updated: Dec 5, 2015, 08:49 AM IST
 लोकलनं प्रवास करणा-या महिलांना कशाची भीती वाटते? title=

मुंबई : मुंबई लोकलनं प्रवास करणा-या महिलांना नेमकी कशाची भीती वाटते, हे एका एनजीओनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय. या सर्वेक्षणातले निष्कर्ष पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. 

अक्षरा नावाच्या एनजीओनं केलेल्या सर्वेक्षणात, महिला ट्रेनमध्ये चढता-उतरताना आणि प्लॅटफॉर्मवर असताना घाबरलेल्या असतात, ही बाब समोर आलीय. याचं कारण आहे समाजकंटकांकडून होणारा त्रास. पुरुषांद्वारे स्टेअरिंग केलं जात असल्याची तक्रार ५६.१३ टक्के महिलांनी केलीय. टोमणे मारले जात असल्याची तक्रार ५१.३४ टक्के महिलांनी केलीय. पुरुष उगाचच स्पर्श करत असल्याची तक्रार ६०.९२ टक्के महिलांनी केलीय. 

एवढंच नाही. यापेक्षाही गंभीर अडचणी महिलांनी सांगितल्या. २९.६९ टक्के महिलांना स्टेशनवरून पाठलाग करणा-यांचा त्रास होतो. २०.५० टक्के महिलांना पुरुषांकडून चिमटे काढण्याचा त्रास सहन करावा लागतो. जनरल डब्यातून महिलांच्या प्रवासावर आक्षेप घेणा-यांचा त्रास १५.५२ टक्के महिलांना सहन करावा लागतो. 

त्यामुळे आता रेल्वेनं दैनंदिन प्रवास करणा-या पन्नास टक्क्यांहून अधिक महिलांना असुरक्षित वाटत असेल, तर मुंबईला सुरक्षित कसं म्हणावं, असा प्रश्न उपस्थित झालाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.