www.24taas.com, मुंबई
ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी राज्यातील वाईन - दारुची दुकानं रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहेत तर परमिट रुम आणि क्लब सकाळी पाचवाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. परंतू दारु पिणाऱ्यांना परवाना आवश्यक असेल. २४,२५ आणि ३१ डिसेंबरला दारु दुकाने उशिरापर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय.
एरवी वाइन - बीअर शॉप रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू असतात पण या तीन दिवसांत त्यांना रात्री एक वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसंच मुंबईसह राज्यातील बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिलीय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने दारू पिण्यासाठी एक महिन्याचा, एक वर्षाचा आणि आजीवन परवाना देण्यात येतो, पण या सर्वांसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पण, तात्पुरत्या स्वरुपात तळीरामांसाठी वाइन शॉप आणि बारमध्ये एक दिवसाच्या परवान्याची सोय करण्यात आली आहे. देशी पिणाऱ्यांसाठी दोन रुपये तर विदेशी पिणाऱ्यांसाठी पाच रुपयांत हा परवाना मिळेल.
२०१३ मधील ड्राय डेज :
जानेवारी : २६, ३०
मार्च : १, २२
मे : १
जुलै : १, १४
ऑगस्ट : १, १५
सप्टेंबर : १, ३, १४
ऑक्टोबर : १, २, ८
नोव्हेंबर : १, ९
डिसेंबर : १, २५