इंटरनेटवर भेटली प्रेयसी भेटायला गेला पाकिस्तानला आणि ३ वर्षपासून जेलमध्ये

गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेला भारतीय इंजिनिअर तरूण निहाल अन्सारी सध्या पाकिस्तानात लष्कराच्या ताब्यात आहे.

Updated: Jan 15, 2016, 02:41 PM IST
इंटरनेटवर भेटली प्रेयसी भेटायला गेला पाकिस्तानला आणि ३ वर्षपासून जेलमध्ये title=

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेला भारतीय इंजिनिअर तरूण निहाल अन्सारी सध्या पाकिस्तानात लष्कराच्या ताब्यात आहे.

तसेच त्याच्याविरूद्ध लष्कराच्या कोर्टात खटला सुरू आहे. याचा खुलास पाकिस्तान सरकारने केला आहे. 

पाकिस्तानतील वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार पाकिस्तान सरकारने मान्य केले आहे.

हमीद सध्या पाकिस्तानच्या लष्कराच्या तरुंगात आहे. त्याच्यावर लष्कराच्या न्यायालयात खटला सुरू आहे. 

सोशल मीडियामध्ये तीन वर्षापूर्वी एका पाकिस्तानी मुलीशी मुलाखत झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आपल्या प्रेमाला मूर्तरूप देण्यासाठी तो सीमेपलीकडे पाकिस्तानात गेला आणि त्याठिकाणी तो बेपत्ता झाला.