www.24taas.com, नागपूर
एके काळी १०,००० चित्ते असलेल्या भारतात मात्र स्वातंत्रोत्तर काळात हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शिकारीमुळे आज देशात एकही चित्ता उरला नाही. पण खाद्य शृंखलेत अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा हा प्राणी आता देशात परत येतो आहे. नागपूरच्या एका महिलेच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया देशातून आता भारतात चक्क चित्ते आयात होणार आहेत. आणि तेही कायम स्वरूपी वास्तव्याकरता.
ताशी १२० किमी च्या गतीनी धावणाऱ्या या प्राणाच्या तावडीतून कुठल्याही प्राण्याचे वाचणे तसे कठीणच. पण इतक्या वेगाने धावणाऱ्या या प्राण्यालाच स्वतंत्र-पूर्व भारतातून हद्दपार होण्याची वेळ आली. कारण वाढती लोकसंख्या आणि औद्योगीकरणासोबत चित्त्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. त्यातच तत्कालीन राजा-महाराजांनी या प्राण्याची शिकार देखील केली. आणि ५०० वर्ष पूर्वी १०,००० च्या संख्यात असणारा चित्ता भारतातून पूर्णपणे नामशेष झाला. वाघाला वाचवण्या करता देशात सर्वत्र उपाययोजना केली जात असताना मात्र चित्त्या सारख्या अति महत्वाच्या प्राण्याला मात्र सर्वे विसरले होते.
पण गेल्या काही वर्षापासून चित्त्याला भारतात परत आणण्या संबंधी प्रयत्न सुरु झालेत. आणि यात पुढाकार घेतला नागपूरच्या वन्यजीव प्रेमी प्रज्ञा गिरडकर यांनी. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना नामिबिया आणि आफ्रिकेत जाण्याची संधी मिळाली. आफ्रिका आणि नामिबिया येथे चीत्त्यांच्या संवर्धनाकरता सुरु असलेल्या प्रकल्पामध्ये काम करण्यास मिळाले म्हणून या प्राण्याला जवळून बघण्याची आणि त्याचा अभ्यास करण्याची संधी देखील मिळाली. आणि तेथूनच सुरु झाली चित्त्याला भारतात आणण्याची तयारी. तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी या प्रकल्प मान्यताच दिली नाही तर या करता ५० लाख डॉलरची तरतूद देखील केली.
या करता आवश्यक असलेल्या सर्व सरकारी बाबींचा विचार झाला असून या वर्षाच्या अखेरी किंवा २०१३ च्या सुरवातीला आफ्रिका आणि नामिबिया मधून १८ चित्ते भारतात येणार आहेत. या चीत्त्यांना शेजारच्या मध्य प्रदेश मधील कुणु पालपूर आणि नवरादेही आणि राजस्थान च्या जैसलमेर मधील शहघर येथे सोडले जाणार आहे. या तिन्ही जंगलाची निवड देहरादून येथील wildlife institute of India ने केली आहे. पण चित्त्यांना जंगलात सोडण्यापूर्वी त्यांना त्या भागातील वातावरणाची सवय होण्याकरता विशेष प्रयत्न करण्याची गरज करण्याची गरज आहे. तर आजवर काही प्रत्यक्षात चित्त्याला बघायला मिळाले नाही म्हणून आता देशात चित्ता येणार असल्याची बातमी ऐकून नागपूरकर देखील सुखावले.
सरकार स्तरावर जरी सर्व प्रयत्न झाले असले तरी आता अविलंब चीत्त्यांना भारतात आणायला हवे. लालफीत शाहीमुळे देशात अनेक प्रकल्पांना आजवर विलंब झाला आहे. किमान या योजनेचा तरी तसे होऊ नये हि सर्व वन्य जीव प्रेमींची इच्छा आहे!