नागपूर जिल्ह्यात आढळले वाघ आणि बिबट्यांचे मृतदेह

नागपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजलीय. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील देवलापार इथं एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळला आहे. अंदाजे ५ ते ६ वर्ष वयाचा हा वाघ आहे. 

Updated: Jan 4, 2016, 12:27 PM IST
नागपूर जिल्ह्यात आढळले वाघ आणि बिबट्यांचे मृतदेह  title=

नागपूर : नागपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजलीय. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील देवलापार इथं एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळला आहे. अंदाजे ५ ते ६ वर्ष वयाचा हा वाघ आहे. 

वाघाच्या शरीरावर कुठल्याच प्रकारच्या जखमा नसल्यानं त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास वनविभाग करत असून वाघाच्या शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. 

तर एका बिबट्याचा मृतदेह चिमनाझरी इथंल्या रेल्वे लाईनच्या शेजारी मिळाला असून बिबट्याच्या अंगावरदेखील कुठल्याच प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही प्राण्यांचा मृत्यू हा नैसर्गिक की अजून काही कारणामुळे झालाय याचा तपास सुरु आहे.