www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नरेंद्र मोदींवरील विधानानंतर नाशिक मनपातील सत्ताधारी मनसे आणि भाजपमध्ये कटूता वाढलीये. उद्या होणा-या भूमिपूजन आणि विकास कामांच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकलाय. दरम्यान, मनसेबरोबरची युती तोडण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
राज ठाकरेंची भूमिका ही काँग्रेस धार्जिणी असल्याचा आरोप भाजपचे शहाराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी केलाय. तसेच श्रेय लाटण्यासाठी मनसेची धडपड असल्याचा आरोप सावजी यांनी केलाय. भाजपच्या स्थानिक पदाधिक-यांच्या बैठकीत भूमिपूजन बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीतील संघर्ष वाढलाय.
मनसेबरोबरची युती तोडण्यावर भाजप ठाम आहे. नाशिकमधील कार्यकर्त्यांची भाजप प्रदेशकडे युती तोडण्याबाबत मागणी केली आहे. राज यांना उत्तर देताना विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांनी जोदार टीका केली. त्याआधी नाशिक दौऱ्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोंदीवर भाष्य केले होते. मोदी यांनी एका राज्याचा विचार न करता संपूर्ण देशाचा विचार करावा. पंतप्रधान पदाचे नाव जाहीर झाल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असे म्हटले होते.
भाजपमधील कार्यकर्त्यांचे मत तीव्र झाले आहे. युती तोडण्याबाबत त्यांनी तसा प्रस्ताव पाठविला आहे, अशी माहिती नेते माधव भंडारी यांनी दिली. युती तोडण्याबाबत निर्णय झाला नाही. याबाबतचा अंतिम फैसला कोअर मिटींगमध्ये होईल. त्याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते घेतील. मात्र, राजकीय विश्लेषकांनी याचा अर्ध काय तो काढवा, असे ते भंडारी म्हणालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.