'वर्ल्डकप'मध्ये पाकिस्तानला झटका

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफान दुखापतीमुळे 'वर्ल्डकप २०१५' मधून बाहेर पडला आहे. खुप खडतर प्रवासानंतर क्वार्टर फायनलमध्ये पोहचलेल्या पाकिस्तानला हा मोठा धक्का बसला आहे.

Updated: Mar 17, 2015, 06:26 PM IST

अॅडिलेड : पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफान दुखापतीमुळे 'वर्ल्डकप २०१५' मधून बाहेर पडला आहे. खुप खडतर प्रवासानंतर क्वार्टर फायनलमध्ये पोहचलेल्या पाकिस्तानला हा मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानचा क्वार्टर फायनल मधील सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा महत्वाचा बॉलर मोहम्मद इरफानची उणीव पाकिस्तानला नक्कीच जाणवेल.

सोमवारी इरफानची एमआरआय स्कॅन करण्यात आलं. त्यात त्याला दुखापत झाल्याच स्पष्ट झाले होते, मात्र तोपर्यंत दुखापत किती गंभीर आहे, हे स्पष्ट झालेले नव्हते, असे पाकिस्तानचे फिजियो ब्रॅड रॉबिनसन यांनी सांगितले. 

मंगळवारी पुन्हा इरफानचे एमआरआय स्कॅन करण्यात आलं, त्यात दुखापत गंभीर असल्याच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दुखापतीने इरफानला वर्ल्ड कपमधून बाहेर काढले असेच म्हणावे लागेल.