ती आली, तिनं चेक दिला आणि तिनं जिंकलं...

आयपीएल-८चं जेतेपदावर मुंबई इंडियन्सने आपलं नाव कोरलं. आयपीएलचा चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्समधील हा अंतिम सामना सर्वांच्याच लक्षात असेल. मात्र या सामन्यात दिसलेला एक चेहरा सध्या सगळ्यांच्याच नजरेसमोर फीरत आहे. 

Updated: May 28, 2015, 08:07 PM IST
ती आली, तिनं चेक दिला आणि तिनं जिंकलं... title=

मुंबई: आयपीएल-८चं जेतेपदावर मुंबई इंडियन्सने आपलं नाव कोरलं. आयपीएलचा चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्समधील हा अंतिम सामना सर्वांच्याच लक्षात असेल. मात्र या सामन्यात दिसलेला एक चेहरा सध्या सगळ्यांच्याच नजरेसमोर फिरत आहे. 

सामन्याच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात एक सुंदरी तेथे उपस्थित होती. ही सुंदरी कोणा क्रिकेटरची पत्नी नाही अथवा अभिनेत्रीही नाही. या रुपवतीचं नाव राखी कपूर टंडन आहे. येस बँकेकडून वितरीत करण्यात येणारा चेक देण्यासाठी राखी या ठिकाणी आली होती. आयपीएलच्या या अंतिम सामन्यानंतर राखीचा फेसबूक आणि ट्विटरवर ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे राखी एका रात्रीत स्टार बनली आहे.

 

कोण आहे राखी कपूर टंडन? 
राखी येस बॅंकेचे सीईओ राणा कपूर यांची मुलगी आहे. ती येस बॅंकेचं मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटर्जीचं कामकाज पाहते. २८ वर्षांची राखी विवाहीत आहे. राखीचे पती अलकेश टंडन दिल्लीचे उद्योगपती आहेत. 

 

सुंदर आणि श्रीमंत असून देखील राखी याआधी कधी प्रकाशझोतात आली नव्हती. मात्र, आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या वितरण सोहळ्यानंतर राखी सर्वश्रूत झाली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.