नाशकात भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

नाशिकमध्ये तिकीट वाटपात डावलल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांना धक्काबुक्की केली. सर्वसाधारण गटातून उज्वला नामदेव हिरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा रोष व्यक्त करत कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची आदळआपट केली.

Updated: Feb 1, 2012, 05:10 PM IST

www.24taas.com,  नाशिक

 

नाशिकमध्ये तिकीट वाटपात डावलल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांना धक्काबुक्की केली.

 

प्रभाग क्रमांक ३१ मधून बाबूराव लोखंडे इच्छुक होते. मात्र त्यांच्या ऐवजी सर्वसाधारण गटातून उज्वला नामदेव हिरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा रोष व्यक्त करत कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची आदळआपट केली. काहीजण सावजी यांच्या अंगावर धावून गेले. लोखंडे आणि इतर पदाधिका-यांमध्ये हाणामारी झाली. भाजपनं २९  जानेवारीला ५८ जणांची यादी जाहीर केल्यानंतर काल ३२ उमेदवारांची नावे जाहीर केली.

 

दरम्यान,  मुंबईत मुलुंडमधल्या नाराज भाजप कार्यकर्त्यांनी 'मुलुंड विकास आघाडी' उघडलीये. आमदार तारासिंग आणि कीरीट सोमय्या यांनी मर्जीतल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप करून, ही आघाडी उघडण्यात आलीय.

 

[jwplayer mediaid="38540"]