गायिका आशा भोसले... आता, डॉ. आशा भोसले!

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भारती विद्यापीठानं मानद ‘डॉक्टरेट ऑफ लेटर्स’ (डी. लिट) ही पदवी प्रदान करून सन्मान केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 16, 2014, 07:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भारती विद्यापीठानं मानद ‘डॉक्टरेट ऑफ लेटर्स’ (डी. लिट) ही पदवी प्रदान करून सन्मान केलाय. तसंच ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी. एन. आर राव मानाची सर्वोच्च ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन गौरविण्यात आलंय.
भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांनी नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली होती. भारती विद्यापीठाच्या १५ व्या पदवीदान समारंभात विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांच्या हस्ते दोघानांही पदवी प्रदान करण्यात आली.
विज्ञान व संशोधनातील योगदानाबद्दल भारतरत्न घोषित झालेल्या शास्त्रज्ञ सी. एन. आर. राव यांना मानाची सर्वोच्च ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ या पदवीनं सन्मानित करण्यात आलंय.
यावेळी सुवर्णपदकविजेत्या विद्यार्थांना आशा भोसले, सी एन आर राव यांचं डॉ.नरेंद्र जाधव यांनी अभिनंदन केलं. आशा भोसले यांनी सर्वात मोठं प्रेम म्हणजे देशप्रेम आणि कर्तव्य म्हणजे देशसेवा असल्याचं म्हटलं. तसेच डॉक्टरेट मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.