३५ जणांच्या हत्येच्या कबुलीनंतर पोलीस पेचात, काय करायचे?

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ६५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला एका खुनाच्या गुन्ह्य़ात संशयावरून ताब्यात घेतले. तो मूळचा बिहारमधील गया जिल्ह्य़ातील आहे. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने बिहारमध्ये केलेला गुन्हा उघडकीस आला. त्यांने आतार्पंयत ३५ जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 12, 2013, 02:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ६५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला एका खुनाच्या गुन्ह्य़ात संशयावरून ताब्यात घेतले. तो मूळचा बिहारमधील गया जिल्ह्य़ातील आहे. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने बिहारमध्ये केलेला गुन्हा उघडकीस आला. त्यांने आतार्पंयत ३५ जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.
पोलिसांनी एका रखवालदाराला एका प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. यावेळी त्याच्याकडून भलतीच माहिती पुढे आली. हा रखवालदार ३५ जणांचे बळी घेणाऱ्या हत्याकांडात सहभागी होता. मात्र, ही घटना २१ वर्षांपूर्वीची आहे.
रखवालदाराने याबाबतची स्वत:हून कबुलीसुद्धा दिली. पण पोलिसांना मात्र या गुन्ह्य़ाची कागदपत्रेच मिळेनात. त्यामुळे आता या रखवालदाराचे करायचे काय, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे! शहरातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ६५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला एका खुनाच्या गुन्ह्य़ात संशयावरून ताब्यात घेतले. तो मूळचा बिहारमधील गया जिल्ह्य़ातील आहे.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने बिहारमध्ये केलेला गुन्हा उघडकीस आला. पोलिसांना या गुन्ह्य़ाची माहिती नव्हती. मात्र, या रखवालदाराने स्वत: ती पोलिसांना पुरवली. १२ फेब्रुवारी १९९२ रोजी बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी गया जिल्ह्य़ातील बारागाव येथील ३५ उच्चवर्णीयांची हत्या केली होती. त्यातील आरोपी असल्याची कबुली या रखवालदाराने दिली. या घटनेनंतर तो पुण्यात आला. मात्र, त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. कारण पोलिसांकडे ठोस कागदपत्रे नसल्याने त्याचे करायचे काय, असा प्रश्न आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.