www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात इंटरनेट बँकिंग द्वारे कर्नलची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कर्नल संजीव शेअर यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कर्नल संजीव शेअर यांनी आयसीआयसीआय बँकेत एका योजनेसाठी पाच लाख रूपयांची गुतंवणूक केली होती. शेअर यांना बुधवारी दुपार फोन केला. या अज्ञात व्यक्तीन शेअर यांना फोन करून वन टाईम पासवर्ड देण्याची मागणी केली.
मात्र कर्नल शेखर यांना पासवर्ड सांगितल्यानंतर संशय आला. म्हणून त्यांनी त्या नंबरवर फोन केला. मात्र तो फोन लागला नाही, त्यानंतर त्यांच्या खात्यातून पाच लाख रूपये हस्तातरीत झाले.
हे पैसे जबलपूरच्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यावर हस्तांतर झाल्याचं आढळून आलं. तसेच या खात्यावरून काही रक्कम तात्काळ काढून घेतलीय, तर काही रकमेची शॉपिंगही करण्यात आली आहे. पैसे ज्या खात्यावर हस्तातरीत झाले ते खातं कुणाचं आहे, याचा शोध सध्या सुरू आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.