शरद पवारांनी सोनियांवर उधळलीत स्तुतीसुमने

सोनिया गांधींना पंतप्रधान बनण्यासाठी विरोध करायला नको होता, असा जाहीर कबुलीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांनी दिलाय. पवारांच्या सोनियांवरील स्तुतीसुमनांनी उपस्थितही आश्यर्यचकीत झाले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 25, 2013, 12:10 PM IST

www.24taas.com,पुणे
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींना पंतप्रधान बनण्यासाठी विरोध करायला नको होता, असा जाहीर कबुलीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलाय.
एवढचं नाही तर पंतप्रधानपद न स्विकारण्याचा सोनिया गांधींचा निर्णय कौतुकास्पद होता, असं म्हणत त्यांनी सोनिया गांधींच्या भूमिकेचं भरभरून कौतुकही केलं. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना पवारांच्या सोनियांवरील स्तुतीसुमनांनी उपस्थितही आश्यर्यचकीत झाले.

सोलापुरातल्या सभेत राज ठाकरेंनी अजित पवारांवर तोफ डागल्यानंतर रविवारी अजित पवारांनी पलटवार राजवर जोरदार टीका करत पलटवार केला. शरद पवारांनीही साता-यात राज ठाकरे हे लहान आहेत. त्यांच्या पोरकट प्रश्नांना उत्तरं द्यायची गरज नाही असं सांगत राज यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करायचं टाळलं. रविवारी लातूरमध्ये असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकारांशी औपचारीक गप्पांमध्ये पवार-काका पुतण्यांना लक्ष केलं होतं.
राज आणि पवार शाब्दीच चकमत उडत असताना पवारांनी सोनियांवर स्तुतीसुमने उधळल्याने पवारांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. शरद पवारांनामध्येच सोनिया गांधी का आठवल्या, याचीच चर्चा सुरू आहे.