www.24taas.com, झी मीडिया, पुणे
२००९ साली पुण्यातल्या नयना पुजारी सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी योगेश राऊतला गुन्हे शाखेने नगर जिल्ह्यातून अटक केलीय.
नयना एक सॉफ्टवेअर इंजिनीअर होती. ७ ऑक्टोबर २००९ ला चार नराधमांनी नयनावर पाशवी बलात्कार करून अतिशय निघृण पद्धतीने तिचा खून केला. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं त्यांनी तिचं अपहरण केलं आणि त्यानंतर नैनावर बलात्कार करून तिची हत्या केली. महेश ठाकूर, योगेश राऊत, राजू चौधरी आणि विश्वास कदम या चौघांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली. मात्र योगेश राऊत हा आरोपी १८ सप्टेंबर २०११ रोजी पोलिसांच्या अटकेत असतानाच पुण्याच्या ससून रूग्णालयातून पळाला होता.
योगेश राऊत हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अशाच प्रकारे आणखी एका महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याचं त्याच्या नार्को टेस्ट मध्ये उघड झालं होतं.
योगेशला अटक व्हावी म्हणून नयानाच्या कुटूंबियांनी आणि पुणेकरांनी मोर्चा काढला होता. जो पर्यंत मुख्य आरोपी योगेश राऊत पोलिसांच्या हाती लागत नाही आणि सगळ्या आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत नयनाला न्याय मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया नयनाचे पती अभिजित पुजारी यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी योगेशच्या शोधासाठी टीम तयार करून अनेक ठिकाणी त्याच्या सोध सुरू केला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.