ww.24taas.com, कोल्हापूर
राज ठाकरे यांच्या कोल्हापुरातील सभेला तुफान गर्दी झाली. कोल्हापुरातील गांधी मैदानावर राज ठाकरेंचे भाषण सुरू झाले. राज ठाकरेंच्या सभेला प्रचंड उत्साह, राज ठाकरेंचा जयघोष सुरू होता. राज ठाकरे यांचे सभेतील उपस्थित चाहत्यांना शांत राहाण्याचे आवाहन करण्यात आलं.
जबड्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना चावणार कसा? मात्र, गोळ्या घेऊन थोडा त्रास कमी झाला - राज
सर्दी खोकलाही झाला असल्यामुळे भाषणाच्यामध्ये जर खोकलो, शिंकलो तर त्याला कमर्शियल ब्रेक समजावा- राज
दौऱ्याची झक्कास सुरूवात झाली, सकाळीच अफझल गुरूच्या फाशीची बातमी समजली- राज
साताऱ्यापासून दौऱ्याला सुरूवात केली, ही सुरूवात चांगली झाली- राज
एका पक्षातून बाहेर पडलो, पुढं काय होणार, पक्ष स्थापन केला. अनेकांना चिंता होती - राज ठाकरे
पक्ष स्थापन केला. त्यावेळी मी कोणाला फोन केला नाही - राज ठाकरे
तुमच्या प्रेमावर आणि विश्वासावर हा सर्व डोलारा उभा आहे - राज ठाकरे
तुमचं प्रेम आणि माझा आत्मविश्वास यांच्या जोरावरच मी इथपर्यंत पोहोचलो आहे- राज ठाकरे
जे माझ्याबरोबर येतील. त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत नेईन. हा माझा शब्द आहे - राज
पक्ष स्थापन केला. पक्ष महाराष्ट्रभर पोहोचला. प्रत्यक्ष मला पोहोचायला वेळ लागला - राज
हा दौरा आहे तो उभा महाराष्ट्र काबीज करण्याचा आहे - राज
युतीच्या चर्चा अशा जाहीरपणे वर्तमानपत्रातून करतात का? - राज
उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंचा टोला
मला कोणाच्या युतीची गरज नाही - राज
युतीचा विचार मनात नाही, जे करायचं आहे ते स्वबळावर करायचं आहे- राज
मराठी मतांमध्ये कोणतीही फुट पडत नाही. राज्यात मराठी लोकच राहतात ना - राज
मराठी मतांवर राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले
मराठी मतांचे राजकारण केले जात आहे. उगाच गैरसमज पसरविले जात आहेत - राज
मराठी मतांचे स्वत:च्या सोयीचे राजकारण केले जात आहे - राज
महाराष्ट्रात आणि देशाभरात माझ्यावर ८९ केसेस माझ्यावर आहेत - राज
सेंच्युरीला ११ केसेस बाकी आहेत-राज
मी कुठल्याही केसला भीक घालत नाही- राज
कितीही केसेस टाका, मी बोलतच राहणार - राज
मी मराठी माणसाच्या हितासाठी बोलणारच - राज
महाराष्ट्रातील नोकऱ्या मराठी मुलांना मिळाल्याच पाहिजे - राज ठाकरे
राज ठाकरेंनी परप्रांतीय मुद्दा बाहेर काढला
हिंदी आणि उर्दुतील परीक्षेला राज ठाकरे यांचा विरोध
अल्पसंख्यांक, हिंदी भाषेतील परीक्षेला महाराष्ट्रात विरोध - राज
राज्य शासनाचा जीआर हा मराठी माणसाच्या मुळावर आहे - राज
राज्य सरकारला चिंता बाहेरील लोकांचीच आहे - राज
महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या मराठी मुलांना मिळायलाच पाहिजे असं म्हंटलं तर मी चुकीचं बोललो? - राज
बाहेरील लोकांचा टक्का वाढविण्याचा उद्योग सुरू आहे - राज
बाहेरील लोकांचा टक्का वाढवून निवडणूक लढविण्याचा डाव सुरू आहे - राज ठाकरे
मराठी माणसाच्या मुळावर उठण्याचा सर्व डाव सुरू आहे - राज
परप्रांतीयांच्या सोयीसाठी सर्व चालले आहे - राज ठाकरे
बिहार आणि उत्तर प्रदेशमधून रेल्वेच्या जास्त गाड्या महाराष्ट्रात येत आहे - राज
देशात इतक्या रेल्वे कुठे जातात ते दाखवा - राज
रेल्वेतील नोकऱ्या मराठी माणसाला मिळाल्या नाहीत, माथी भडकलीत आणि जे व्हायचं ते झालं - राज
तुमच्या पोलीस खात्यातही काही दिवसांनी हे परप्रांतीयच दिसतील - राज
बाहेरच्या लोकांनी आई-बहिणींवर हात टाकले तर त्यांचे हात तिथला तिथे कलम करा - राज
नामर्द सरकारमुळे महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत - राज
अजित पवार यांच्यावर राज ठाकरे यांची टीका
अजित पवार यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. आम्हाला सर्व काही कळत - राज
राज ठाकरे यांनी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी यांची उडविली खिल्ली
मग येतात त्या सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग भेटीसाठी - राज
तो राहुल गांधी, असा हात करतो जसा काय टेम्पो धुवायचा काय? - राज
राज्यात आजही वीज पोहोचली नाही, लोडशेडींग सुरूच आहे - राज
महाराष्ट्र मला गुजरातसारखा करायचाय -राज
मला तुमची साथ हवीय, बघा काय करून दाखवतोय - राज
जनतेला बांधुन तुंबड्या भरल्या जात आहेत - राज
आजही त्याच समस्या आहेत. समस्या सोडविल्या जात नाही - राज
तुमच्यावर लादला गेला आहे टोल - राज
निवडणुकीचा फंड देण्यासाठी टोल सुरू आहे - राज
आमच्या आंदोलनानंतर ६५ टोल बंद करण्याची वेळ छगन