www.24taas.com, कोल्हापूर
`आमच्या आया-बहिणींवर हात टाकणाऱ्या या परप्रांतियांचे हात-पाय तिथल्या तिथे तोडून टाका` असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर ठाकरी शैलीत प्रहार केला. `सांगलीमध्ये एका शेतकऱ्यांच्या मुलीवर उत्तर भारतातून आलेल्या एकान ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला,` अशा या नराधमांना तुम्ही असचं सोडणार?` असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठी तरूणांना आदेशच दिला, `ह्या भडव्यांचे हात-पायच कलम करा...`
`उत्तर भारतातून रोज ५६ गाड्या येतात. हे परप्रांतिय येतात, आणि आमच्या आया-बहिणीवर हात टाकतात.` `९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करतात.` `आमच्या पोरांना सांगणं आहे, ह्या अशा लोकांचे हात-पाय कलम करा.` असं म्हणत राज ठाकरे यांनी परप्रांतियांच्या मुद्द्याला हात घालत. खळबळजनक वक्तव्य केलं. त्यामुळे राज यांच्या ह्या वक्तव्यावरून आता नक्की काय घडणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
`आमच्या आया-बहिणींवर हात टाकणार आणि तुम्ही ते पाहणार का?, माझं पोलिसांना पण सांगणं आहे, दुर्लक्ष करा आमच्या पोरांकडे जरा, आदेशाची वाट वैगरे पाहू नका तिथल्या तिथे हात कलम करा,` `राज हे सगळं करतात कारण की, त्या परप्रांतियांना देखील माहिती आहे की, हे सरकार कणा नसलेले आहे. त्यामुळेच त्यांची एवढी हिंमत वाढली आहे.`
राज ठाकरे यांचा महाराष्ट्रव्यापी दौऱ्याला सुरवात झाली. आणि आज कोल्हापुरात पहिलीच सभा घेऊन त्यांनी आपली मुलुखमैदान तोफ डागली.