www.24taas.com, मुंबई
मनसे आणि `दादां`च्या राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक चकमकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थाची भूमिका घेतली. राज यांना अडवू नये, अशी सूचना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांनी केलीय. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतलीय. पाहुयात काय काय म्हणालेत ते या पत्रकार परिषदेत...
राज ठाकरे म्हणतात...
• शरद पवारांना मी प्रश्न विचारलेत, त्यांच्यावर टीका केलेली नाही
• राष्ट्रवादी या दुष्काळाला जबाबदार आहे
• महाराष्ट्रातील दुष्काळ हा मानव निर्मित आहे
• जे चुकीचं आहे ते मी बोलणारच
• माझी भूमिका मराठी माणसाबद्दल आहे, त्यात काहीही बदल होणार नाही
• महाराष्ट्रात जर नोकऱ्या निर्माण होणार असतील तर त्या पहिलांदा मराठी माणसाला प्राधान्य दिले पाहीजे
• दुष्काळात आयपीएल क्रिकेटचे सामने कशासाठी?
• मी पुण्याला सहज जाणार होतो
• परीक्षेच्या काळात संघर्ष टाळावा
• मला संघर्ष करण्याची मुळीच ईच्छा नाही
• मी माझं मत मांडत असतो
• कोणी तरी मुर्खासारखे बोलतं, त्यामुळे मी लक्ष घातलं
• पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आव्हान दिल्याने मी पुण्यात जाणार असल्याचे जाहीर केलं