सिंचन घोटाळा : राज ठाकरेंना विनोद तावडेंचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी टोला लगावलाय. मनसे आमदारांना घोटाळा बाहेर काढणं जमलं तरी असतं का? सिंचन घोटाळा भारतीय जनता पक्षाने बाहेर काढलाय, असं तावडेंनी राज यांना प्रत्युत्तर केलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 6, 2013, 05:02 PM IST

www.24taas.com,मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी टोला लगावलाय. मनसे आमदारांना घोटाळा बाहेर काढणं जमलं तरी असतं का? सिंचन घोटाळा भारतीय जनता पक्षाने बाहेर काढलाय, असं तावडेंनी राज यांना प्रत्युत्तर केलंय.
राज ठाकरे यांनी जालन्याच्या सभेत शिवसेना भाजपही सिंचन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना हा घोटाळाच तावडे आणि एकनाथ खडसे यांनी शोधल्याचे स्पष्टीकरण तावडेंनी दिलेय. मनसेच्या आमदारांना हे शोधणे शक्य होते का, हा विचार त्यांनीच करावा असा टोलाही त्यांनी मनसेला लगावलाय.

राज्यात दुष्काळाचे मोठे सावट आहे. पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. कित्येक कोटी रूपये सिंचनावर खर्ची टाकण्यात आलेत. मात्र, सिंचन प्रकल्प पूर्ण होऊ शकलेले नाहीत. यात सत्ताधारी राष्ट्रवादीसह विरोधी पक्ष शिवसेना आणि भाजप यांची मिलीभगत असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर म्हटले होते. सिंचन प्रकल्प रखडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार कारणीभूत असल्याचा आरोप राज यांनी केला होता.