`बीग बॉस`च्या प्रत्येक भागासाठी ७.७५ करोड!

बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान आता छोट्या पडद्यावरही दबंग ठरलाय. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर ‘सलमान’ हे नावचं मोठं ठरतंय. बॉलिवूडमध्ये मोठी कमाई करणारा दबंग खान आता छोट्या पडद्यावरही सर्वात जास्त मेहताना घेणारा कलाकार ठरलाय. हा खुलासा कलर्स चॅनलवर प्रसारित होणाऱ्या बीग बॉस सीझन ६ च्या संदर्भात झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 8, 2013, 04:55 PM IST

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान आता छोट्या पडद्यावरही दबंग ठरलाय. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर ‘सलमान’ हे नावचं मोठं ठरतंय. बॉलिवूडमध्ये मोठी कमाई करणारा दबंग खान आता छोट्या पडद्यावरही सर्वात जास्त मेहताना घेणारा कलाकार ठरलाय. हा खुलासा कलर्स चॅनलवर प्रसारित होणाऱ्या बीग बॉस सीझन ६ च्या संदर्भात झालाय.
नुकत्याच, एका वर्तमानपत्रानं मुलाखतीदरम्यान सलमानला बीग बॉस सीझन ६ च्या प्रत्येक भागासाठी किती मानधन घेतोस असा प्रश्न विचारला गेला. यावर ताबडतोब सलमाननं उत्तर दिलं की, ‘मला वाटतं की बीग बॉस सीझन ६ साठी मी प्रत्येक भागासाठी ७ करोड ७५ लाख रुपये घेतो’.
यापुढे सलमान म्हणाला की, ‘तुम्ही लिहा की मी बीग बॉस सीझन ६ च्या प्रत्येक भागासाठी ७.७५ करोड रुपये घेतो. त्यानंतर प्रत्येक भागाच्या रिपीट टेलिकास्टसाठी परत एक करोड रुपये घेतो आणि त्यानंतरची रक्कम मात्र मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे मी निश्चित करतो’.

नशीब असावं तर सलमानसारखं... असं तुम्हालाही वाटत असेल ना! विशेष गोष्ट म्हणजे, सलमाननं त्याच्या शेवटच्या चार सिनेमांमध्ये १०० करोडच्या क्लबमध्ये स्थान मिळवलंय म्हणजे १०० करोडपेक्षा जास्त गल्ला गोळा केलाय. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दबंग २’नंही आत्तापर्यंत १५० करोड रुपयांचा धंदा केलाय. तर याच्या आधी १५ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या एक था टायगरनं तब्बल २०० करोड रुपयांचा गल्ला गोळा केलाय.