'तारक मेहता...'ची 'दया भाभी' लग्नाच्या बेडीत!

प्रसिद्ध टीव्ही सिरीयल 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील दया भाभी म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी हिचा लग्न समारंभ नुकताच पार पडलाय.... अगदी साध्या पध्दतीचे असं हे लग्न होतं.

Updated: Nov 25, 2015, 06:33 PM IST
'तारक मेहता...'ची 'दया भाभी' लग्नाच्या बेडीत!

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही सिरीयल 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील दया भाभी म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी हिचा लग्न समारंभ नुकताच पार पडलाय.... अगदी साध्या पध्दतीचे असं हे लग्न होतं.

'सब'टीव्हीवर दिसणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी सिरीयलमधून घराघरांमध्ये पोहचलेल्या दिशानं मुंबईस्थित चार्टड अकाउंटंट मयुरसोबत लग्नाची गाठ बांधलीय. 

 


दिशा आणि मयुर लग्न समारंभाच्या वेळी

या लग्नासाठी केवळ दिशा आणि मयुर या दोघांचे कुटुंबीय आणि काही मोजके नातेवाईक यांची उपस्थिती होती. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या सीरीयलमधील किंवा इतर कोणतेही टीव्ही कलाकार, सेलिब्रिटी आणि मित्रमंडळी या लग्नासाठी हजर नव्हते. दिशा आणि मयूरच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा २६ नोव्हेंबरला पार पडणार आहे. तेव्हा कदाचित ही मित्र मंडळी उपस्थिती लावून वधु-वरांना आशिर्वाद देताना दिसू शकतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.