छोट्या पडद्यावरील `कुंभकर्ण` राकेश दीवानांचं निधन

2008-09मध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका `रामायण`मध्ये कुंभकर्णची भूमिका करणारे अभिनेते राकेश दीवाना यांचं दुर्दैवी निधन झालंय. दुर्दैवी यासाठी कारण त्यांच्या मृत्यूचं कारण म्हणजे त्यांची चरबी नाही तर त्यासाठी केलेलं ऑपरेशन ठरलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 28, 2014, 10:34 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
2008-09मध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका `रामायण`मध्ये कुंभकर्णची भूमिका करणारे अभिनेते राकेश दीवाना यांचं दुर्दैवी निधन झालंय. दुर्दैवी यासाठी कारण त्यांच्या मृत्यूचं कारण म्हणजे त्यांची चरबी नाही तर त्यासाठी केलेलं ऑपरेशन ठरलं.
चार दिवसांपूर्वी राकेश यांनी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये वजन कमी करण्याचं ऑपरेशन केलं. 48 वर्षीय राकेश `ये रिश्ता क्या कहलाता है` या मालिकेतील स्वयंपाकीची भूमिकाही खूप गाजलेली आहे.
राकेश बेरियाट्रिक सर्जरी करण्यासाठी शहरातील मोहक हॉस्पिटलमध्ये 20 एप्रिलला भर्ती झाले होते. राकेश यांच्या कुटुंबियांनी मीडियाशी बोलतांना सांगितलं, की त्यांचा मृत्यू उपचारांतील निष्काळजीपणामुळे झाला. मात्र हॉस्पिटलनं हे अमान्य केलंय.
हॉस्पिलटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जेव्हा राकेश यांचं 23 एप्रिलला ऑपरेशन झालं तेव्हा त्यांची प्रकृती नॉर्मल होती. मात्र 24 एप्रिलला हायपरटेंशन आणि मेंदूसंबंधी समस्येत वाढ होऊन त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं. राकेश यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले मात्र अपयश आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.