नवी दिल्ली : अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भारताने विजयासाठी दिलेले ४८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला
पण या कसोटीत एकूण १० रेकॉर्ड झाले. टाकू या त्यावर एक नजर
१) उमेश यादव याने २१ षटकात १६ मेडन षटक टाकत केवळ ९ धावा दिल्या आणि तीन विकेट पटकावल्या.
२) टीम इंडियाचा भारतामधील सर्वात मोठा विजय आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला ३३७ धावांनी पराभूत केले. यापूर्वी २००८ मध्ये भारताने मोहालीत ऑस्ट्रेलियाचा ३२० धावांनी पराभव केला होता.
३) रवींद्र जडेजा याने ४६ षटकात ३३ मेडन षटकं टाकण्याचा रेकॉर्ड मिळविला.
४) भारत दक्षिण आफ्रिका मालिकेतील जेपी ड्युमिनीची सर्वात वाईट कामगिरी. १०.६२ च्या अत्यंत वाईट सरासरीने त्याने धावा काढल्या. त्या कोणत्याही देशाविरूद्ध २० च्या सरासरी पेक्षा कमी धावा केलेल्या नाहीत.
५) सर्वात धिमी भागिदारी २०० चेंडूत आमला आणि डिव्हीलिअर्स यांनी केवळ २७ धावा केल्या. आतापर्यंतची जगातील सर्वात धिमी भागिदारी आहे.
६) सलग १७ मेडन षटके रविंद्र जडेजाने टाकली हे एक विशेष आहे पण त्याने बाबू नाडकर्णी यांचा सलग २१ षटके मेडन टाकण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला नाही. नाडकर्णी यांनी १९६३-६४ मध्ये चेन्नईत इंग्लंड विरूद्ध ही कामगिरी केली होती.
७) हाशिम आमला याने २०० चेंडूत २५ धावा करण्याचा विक्रम केला आहे. ही सर्वात कमी वेगाने केलेली धावसंख्या आहे.
८) पहिल्या ५० षटकात केवळ ४९ धावा केल्याने ही आफ्रिकेची कोणत्याही संघाविरुद्ध सर्वात वाईट कामगिरी आहे. असे त्यांनी २००२ नंतर पहिल्यांदा केले आहे. यापूर्वी २००५ मध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध ५० षटकात केवळ ६८ धावा दक्षिण आफ्रिकेने काढल्या होत्या.
९) भारताने आतापर्यंत सर्वात मोठे लक्ष्य या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला दिले होते. ४८१ धावांचे लक्ष्य या सामन्यात होते. हे आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरूद्धचे सर्वाधिक आणि इतर संघाविरूद्धचे पाचव्या क्रमांकाचे लक्ष्य आहे.
१०) दोन्ही इनिंगमध्ये शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत अजिंक्य रहाणे याने वर्णी लावली आहे. यापूर्वी हजारे, गावस्कर, द्रविड आणि विराट कोहली यांनी कामगिरी केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.