पुणे: आयपीएलच्या यंदाच्या मोसमामध्ये पुण्याची टीम पहिल्यांदाच खेळत आहे. या पहिल्याच मोसमामध्ये पुण्याची कामगिरी अत्यंत वाईट झाली आहे. आत्तापर्यंत झालेल्या आठ मॅचमध्ये पुण्याला फक्त दोन मॅचमध्येच विजय मिळवता आला आहे.
पुण्याच्या या खराब कामगिरीमुळे धोनीच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पुण्याचा टीममध्ये इरफान पठाण असूनही आत्तापर्यंत झालेल्या 9 मॅचमध्ये त्याला एकदाही संधी देण्यात आली नाही. मुख्य म्हणजे पूर्ण फीट असूनही इरफान सारख्या ऑल राऊंडरला बसवून ठेवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.
सय्यद मुश्ताक अली टी 20 मध्येही इरफान पठाणची कामगिरी चांगली झाली होती. इरफाननं या मालिकेमध्ये 17 विकेट घेतल्या होत्या. या मालिकेमधला इरफान हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. तसंच इरफाननं 152.67 च्या स्ट्राईक रेटनं 200 रनही केल्या होत्या.
फॉर्म आणि फिटनेस या दोन्ही बाबतीत पठाणबाबत शंका उपस्थित करायला वाव दिसत नाही. याआधीही इरफान चेन्नई सुपरकिंग्जच्या टीममध्ये होता, तेव्हाही त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नव्हती. त्यामुळे इरफानच्या न खेळण्याच्या कारणाबाबत मात्र तर्कवितर्क लावले जात आहेत.