रसेल-चावलाचा अफलातून कॅच

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला सर्वोत्तम क्षण सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला.

Updated: Apr 16, 2016, 10:12 PM IST
रसेल-चावलाचा अफलातून कॅच title=

हैदराबाद: आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला सर्वोत्तम क्षण सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. कोलकत्याच्या आंद्रे रसेल आणि पियुष चावलानं अप्रतिम कॅच पकडला. 

हैदराबादच्या बॅटिंगवेळी 18 व्या ओव्हरला नमन ओझानं सिक्स मारायचा प्रयत्न केला. तेव्हा बाऊंड्री लाईनवर पळत जाऊन रसेलनं हा कॅच पकडला, पण आपण बाऊंड्री लाईनच्या बाहेर जात असल्याचं लक्षात येताच रसेलनं बॉल बाजुलाच असलेल्या चावलाकडे फेकला आणि चावलानं तो कॅच पूर्ण केला. क्रिकेटच्या इतिहासामधला कदाचित हा सर्वोत्तम पैकी एक कॅच म्हणून गणला जाईल.

पाहा हा अफलातून कॅच