...मास्टर ब्लास्टरचा हा रेकॉर्ड तोडणं कुणालाही जमलं नाही!

वर्ल्ड कप २०१५ मध्ये बरेच नवे रेकॉर्ड रचले गेले. रन्स आणि सेन्चुरीजचा अक्षरश: पाऊस पडला. या रन्सच्या पावसात सचिनच्या नावावर असलेला 'सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड' मात्र धुवून काढणं मात्र एकाही वर्ल्डकप महारथीला शक्य झालं नाही.

Updated: Mar 31, 2015, 02:18 PM IST
...मास्टर ब्लास्टरचा हा रेकॉर्ड तोडणं कुणालाही जमलं नाही! title=

मुंबई : वर्ल्ड कप २०१५ मध्ये बरेच नवे रेकॉर्ड रचले गेले. रन्स आणि सेन्चुरीजचा अक्षरश: पाऊस पडला. या रन्सच्या पावसात सचिनच्या नावावर असलेला 'सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड' मात्र धुवून काढणं मात्र एकाही वर्ल्डकप महारथीला शक्य झालं नाही.

सचिनने २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ११ मॅचमध्ये ६१.१८ च्या सरासरीने ६७३ रन्स ठोकले होते. यामध्ये एक शतकाचा आणि सहा अर्धशतकांचाही समावेश होता. 

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मात्र ग्रुप मॅचेसमध्ये ज्या प्रकारे रन्स होत होते त्यावरून, सचिनचा हा रेकॉर्डही धुवून  निघणार की काय? अशी शक्यता अनेकांच्या मनाला लागून राहिली होती. मात्र, सचिनचा हा रेकॉर्ड मोडणं मात्र एकाही क्रिकेटरला जमलेलं नाही. 
 
या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकाराने सलग चार शतकं ठोकण्याचा रेकॉर्ड केला. न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलनं नाबाद २३७ आणि वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने २१५ रनांची सर्वोत्कृष्ट इनिंग खेळली होती. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डीव्हिलियर्सनं सर्वांत जलद १५० रन्स बनवण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. 

रन्स आणि सेन्चुरीजच्या या रेकॉर्ड्समध्ये सचिनचा रेकॉर्ड मात्र सुरक्षित राहिला. वर्ल्ड कप २०१५ मध्ये न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने ६८.३७ च्या सरासरीने सर्वाधिक ५४७ रन केले. तो सचिनच्या २००३ सालच्या रेकॉर्डपासून बराच दूर राहिला. त्यामुळे सचिनचा हा रेकॉर्ड या वर्ल्ड कपमध्ये तरी अबाधित राहिलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.