नवी दिल्ली : क्रिकेटच्या जगतातील आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मीडियात आलेल्या बातम्यांनुसार टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आगामी आशिया कप खेळणे अवघड दिसते आहे. त्याच्या जागी टीम इंडियात पार्थिव पटेल याला संधी देण्यात येणार आहे.
टीव्ही रिपोर्टनुसार महेंद्रसिंग याच्या मसल्समध्ये दुखापत झाल्याने त्याला आशिया कपपासून मुकावे लागणार आहे. बीसीसीआयकडूनही याचे पुष्टी करण्यात आली आहे.
बीसीसीआयने ट्विट करून माहिती दिली की, सराव करताना धोनीच्या पायाची नस ताणली गेली. त्यामुळे धोनीच्या ऐवजी पार्थिव पटेल याने सराव केला.
येत्या २४ फेब्रुवारीपासून एशिया कप सुरू होत आहे. पहिला सामना भारत वि. बांगलादेश होणार आहे. धोनी नसल्याने टीम इंडियाला मोठा झटका बसणार आहे.
नुकतेच टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचला. टी-२० सामन्याची मालिका ३-०ने जिकून १४० वर्षात जे झाले नाही ते करू दाखविले होते. तसेच श्रीलंकेलाही २-१ ने पराभूत केले.