बाऊंसर बॉल लागल्याने ऑस्ट्रेलियाचा ह्युजेस गंभीर

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा हादरा बसला आहे. धडकाकेबाज फलंदाज फिल ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल आदळल्यानं तो मैदानावरच कोसळला. हेल्मेट असताना सुद्धा तो जायबंदी झालाय. त्याची स्थिती गंभीर झाली आहे. 

Reuters | Updated: Nov 25, 2014, 03:07 PM IST

सिडनी : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा हादरा बसला आहे. धडकाकेबाज फलंदाज फिल ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल आदळल्यानं तो मैदानावरच कोसळला. हेल्मेट असताना सुद्धा तो जायबंदी झालाय. त्याची स्थिती गंभीर झाली आहे.


फिल ह्युजेस

टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज होता. मात्र, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शेफिल्ड शिल्ड स्पर्धेदरम्यान, ऑस्ट्रेलियने फलंदाज फिल ह्युजेस

यांच्या डोक्यावर बॉल बसला. त्याचवेळी तो मैदानावरच कोसळला. गंभीर जखमी ह्युजेसच्या डोक्यावरनं शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, तो कोमात गेलाय.

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी कर्णधार मायकल क्लार्कची १२ जणांच्या संघात निवड झाली आहे. मात्र, तो पूर्णपणे 'फिट' नाही. त्याच्या मांडीचा स्नायू दुखावलेला आहे. त्यामुळे ह्युजेसला संधी मिळण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवर निवड समितीचं लक्ष होतं. त्यांने खेळावर लक्ष केंद्रीत केलं होतं. अर्धशतक झळकावल्यानंतर त्यानं फटकेबाजी सुरू केली होती. त्या नादातच, ६३ धावांवर असताना सीन अॅबॉटचा एक उसळता बॉल तो हुक करायला गेला आणि तो डोक्यावरच बसला.

२५ वर्षांचा ह्युजेस हेल्मेट घालूनच खेळत होता. त्यामुळे बाऊंसर बॉल थेट त्याच्या डोक्यावर आदळला नसला तरी वेगवान बॉलने डोक्याला मार बसला. तो खाली पडला त्याचवेळी बेशुद्धावस्थेत गेला. त्याच्या उपचारासाठी तीन अॅम्ब्युलन्स आणि एअर अॅम्ब्युलन्स मैदानावर दाखल झाल्या.  त्याची तब्येत नाजूक असून पुढचे २४ ते ४८ तास काळजीचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

ही माहिती मिळताच कर्णधार मायकल क्लार्क हॉस्पीटला पोहोचला आणि त्यानं ह्युजेसच्या कुटुंबीयांना आधार दिला. तो लवकर बरा व्हावा, अशा सदिच्छा ट्विटरवरून व्यक्त होत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.