अक्षर पटेल, रविंद्र जडेजा ऑल राउंडर म्हणून 'फेल'

 भारतीय टीम ऑल राउंडर म्हणून असलेले अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा बांगलादेश दौऱ्यात सपशेल फेल ठरले आहेत. महेंद्र सिंग धोनीच्या टीम इंडियाला जिंकण्यासाठी एक तर वरच्या फळीतील फलंदाजांवर किंवा गोलंदाजांच्या कामगिरींवर अवलंबून राहावे लागते. मधल्या फळीतील ऑल राउंडर गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरले आहे. 

Updated: Jun 23, 2015, 06:13 PM IST
अक्षर पटेल, रविंद्र जडेजा ऑल राउंडर म्हणून 'फेल' title=

नवी दिल्ली :  भारतीय टीम ऑल राउंडर म्हणून असलेले अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा बांगलादेश दौऱ्यात सपशेल फेल ठरले आहेत. महेंद्र सिंग धोनीच्या टीम इंडियाला जिंकण्यासाठी एक तर वरच्या फळीतील फलंदाजांवर किंवा गोलंदाजांच्या कामगिरींवर अवलंबून राहावे लागते. मधल्या फळीतील ऑल राउंडर गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरले आहे. 

ऑल राउंडर म्हणून टीम इंडियात रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि स्टुअर्ट बिन्नी यांना निवडण्यात आले. त्यातील जडेजा आणि पटेल गोलंदाजी आणि फलंदाजीत अपयशी केले आहे. तर स्टुअर्ट बिन्नीला संधी मिळाली नाही. 

जडेजा कायम संघात ठेवण्याचा आग्रह केला जातो पण जडेजाने सप्टेंबर २०१४ मध्ये सर्वात चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर अजूनही त्याची बॅट तळपली नाही. तसेच गोलंदाजीमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. 

अक्षर पटेल याला २०१४ च्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे भारतीय संघात स्थान मिळाले. पण एकूण १४ सामन्यात त्याने केवळ १७ विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाजीची सरासरी केवळ ६.८३ आहे. 

स्टुअर्ट बिन्नी याला संधी मिळायला हवी पण दुर्दैवाने त्या अद्याप योग्य संधी मिळालेली नाही. 

रणजी खेळणारे अनेक युवा खेळाडू आहे. त्यांना भारतीय संघामध्ये संधी देऊन ऑल राउंडरची जागा भरली जाऊ शकते. आता जडेजा आणि अक्षर पटेल यांनी पुन्हा घरगुती क्रिकेट खेळून आपल्या खेळाचा दर्जा सुधारण्याची वेळ आली आहे. 

ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लड आणि न्यूझीलंड हे देश ऑल राउंडरला प्राधान्य देतात. तसेच त्यांचे ऑल राउंडर सामने जिंकू देतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.