पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने रचला नवा विक्रम

आशिया कपमध्ये बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात बुधवारी नवा विक्रम रचला गेला. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पाच विकेटनी हरवले आणि फायनलमध्ये धडक मारली. 

Updated: Mar 3, 2016, 01:34 PM IST
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने रचला नवा विक्रम title=

मिरपूर : आशिया कपमध्ये बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात बुधवारी नवा विक्रम रचला गेला. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पाच विकेटनी हरवले आणि फायनलमध्ये धडक मारली. 

बांगलादेशच्या या विजयाची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगतेय मात्र त्याचबरोबर बांगलादेशने टी-२०च्या इतिहासात नवा विक्रम केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. २० षटकांत पाकिस्तानने सात विकेट गमावताना १२९ धावा केल्या. मात्र या धावसंख्येत बांगलादेशने त्यांना एकही एक्स्ट्रा धाव दिली नाही. 

टी-२०च्या इतिहासात एका डावात एकही धाव न देण्याचा विक्रम आता बांगलादेशच्या नावावर झालाय. बांगलादेशने पाकिस्तानचे आव्हान १९.१ षटकांत पाच विकेट राखत पूर्ण केले आणि धक्कादायक विजयाची नोंद केली.