सुनिल नारायणचा आयपीएल-८मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा

वेस्ट इंडिजचा जादुई स्पिनर आणि आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडरकडून खेळणारा सुनिल नारायणचा आयपीएल-८मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयच्या रिव्ह्यू कमिटीनं नारायणच्या बॉलिंग अॅक्शनला क्लीन चिट दिली आहे. 

Updated: Apr 9, 2015, 06:29 PM IST
सुनिल नारायणचा आयपीएल-८मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा  title=

मुंबई : वेस्ट इंडिजचा जादुई स्पिनर आणि आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडरकडून खेळणारा सुनिल नारायणचा आयपीएल-८मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयच्या रिव्ह्यू कमिटीनं नारायणच्या बॉलिंग अॅक्शनला क्लीन चिट दिली आहे. 

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये चॅम्पियन टी-२० लीगच्या एका मॅचदरम्यान सुनिल नारायणच्या बॉलिंग अॅक्शनवर आक्षेप घेण्यात आला होता. त्याच्या बॉलिंग अॅक्शनची तपासणी करण्यासाठी बीसीसीआयनं रिव्ह्यू कमिटी नेमली होती. 

रिव्ह्यू कमिटीमध्ये एस. वेंकटराघवन, जवागल श्रीनाथ आणि ए. व्ही. जयप्रकाश सहभागी होते. श्रीनाथ अध्यक्ष असलेल्या या कमिटीनं नारायणच्या अनेक बॉलिंग टेस्ट घेतल्या. त्यानंतर रिव्ह्यू कमिटीनं त्याला क्लीन चीट दिली आहे. 

त्यामुळे आता नारायण बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये त्याच्या चाहत्यांना खेळतांना दिसू शकेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.