भुवनेश्वर कुमारकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. 

Updated: Aug 13, 2016, 08:38 AM IST
भुवनेश्वर कुमारकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा title=

सेंट लुशिया : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 157 रनवर तीन विकेट आहे. अजिंक्य रहाणे 51 रनवर तर रोहित शर्मा 41 रनवर खेळत आहे. भारताकडे आता 285 रनचा लीड आहे.

त्याआधी भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारनं वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला. तिसरा दिवस पावसानं फुकट गेल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय बॉलरनी चांगली कामगिरी करत वेस्ट इंडिजची इनिंग 225 रनवर संपवली.

भुवनेश्वर कुमारनं वेस्ट इंडिजच्या पाच तर आर.अश्विननं दोन आणि इशांत शर्मा-रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजची टीम 225 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे भारताला 128 रनचा लीड मिळाला.