प्रियंका चौधरीशी झाला सुरेश रैनाचा साखरपुडा!

 टीम इंडियाचा मध्यम फलंदाज सुरेश रैनाच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली आहे. गाझियाबादमध्ये प्रियंका चौधरीने रैनासोबत साखरपुडा झाला आहे. 

Updated: Apr 1, 2015, 06:18 PM IST
प्रियंका चौधरीशी झाला सुरेश रैनाचा साखरपुडा! title=

गाझियाबाद :  टीम इंडियाचा मध्यम फलंदाज सुरेश रैनाच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली आहे. गाझियाबादमध्ये प्रियंका चौधरीने रैनासोबत साखरपुडा झाला आहे.  पण एक एप्रिल रोजी केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत....

सुरेश रैना साखरपुडा झाल्यानंतर सरळ कारमध्ये बसून आपल्या इच्छित स्थळी रवाना झाला. 

साखरपुड्याचा कार्यक्रम रैनाच्या गाझियाबादच्या घरी झाला. रैनाचे लग्न येत्या शुक्रवारी होणार आहे. रैना आपल्या आईची मैत्रिणीची मुलगी प्रियंका चौधऱीसह लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. 

रैना आणि प्रियंका यांचा विवाह दिल्लीच्या हॉटेल लीला पॅलेस येथे होणार आहे. यानंतर दिल्लीत स्पेशल रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. यात पंतप्रधान मोदी, यूपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, तसेच बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि खेळाडू उपस्थित राहणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.