मुंबई : सेल्फी हा आज अनेकांच्या जीवनातला अविभाज्य भाग झाला आहे. अनेक जण हे सिनेकलाकार, खेळाडू किंवा मोठ्या लोकांसोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सूक असतात. सेल्फीमुळे तर हे अजून सोपं झालं आहे.
फुटबॉल फॅन्सचं खेळाप्रती असलेलं प्रेम हे वेगळं सांगायला नको. आपल्या आवडत्या खेळाडूसोबत कोणाला सेल्फी काढण्याचा मोह नाही होणार. असाच मोह एका युरो कपच्या फायनलमध्ये एका चाहत्याला झाला.
ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत सेल्फी काढण्यासाठी एक चाहता सुरक्षेचं कवच भेदून मैदानावर आला. मॅच हरल्याचं दु:ख, चेहऱ्यावर तणाव ऐवढं असतांनाही रोनाल्डोने या चाहत्याची निराशा नाही केली. सुरक्षा रक्षक या चैहत्याला पकडण्यासाठी त्याच्याकडे धावले पण रोनाल्डोने त्यांना थांबवलं. त्याने मोबाईल काढला आणि सेल्फी काढण्यासाठी मोबाईल समोर धरला. ऐवढा मोठा क्षण या चाहत्यासाठी होता पण याच वेळी या चाहत्याचा मोबाईल हँग झाला.
रोनाल्डोवर त्या दिवशी खूप मोठी जबाबदारी होती. अख्या जगाचं लक्ष त्याच्यावर होतं पण ऐवढं असतांनाही रोनाल्डोने चाहत्यासोबत थांबून फोटो काढला. यानंतर रोनाल्डोवर जगभरातून कोतूकाचा वर्षावही झाला.