चेन्नईच्या टीमला विसरू शकत नाही-धोनी

आयपीएलच्या पहिल्या आठ सिझनमध्ये महेंद्रसिंग धोनीनं चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व केलं. 

Updated: Feb 15, 2016, 07:51 PM IST
चेन्नईच्या टीमला विसरू शकत नाही-धोनी title=

नवी दिल्ली: आयपीएलच्या पहिल्या आठ सिझनमध्ये महेंद्रसिंग धोनीनं चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व केलं. यंदाच्या सिझनमध्ये मात्र धोनी हा पुण्याच्या टीमचं नेतृत्व करणार आहे.

पण पुण्याचं नेतृत्व करणं वेगळं असल्याची प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे. पहिल्या आठ सिझनमध्ये मी चेन्नईचं नेतृत्व केलं, ते विसरणं अशक्य आहे. आठ वर्ष चेन्नईकडून खेळताना एक वेगळंच नातं तयार झालं होतं, असं धोनी म्हणाला. चेन्नईबाबतच्या या आठवणी सांगताना धोनी भावूक झाला होता.

आयपीएलची पुण्याची टीम रायजिंग पुणे सुपरजायंट्सच्या जर्सीचं अनावरण धोनीच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी धोनीनं चेन्नई सुपर किंग्जच्या आठवणींना उजाळा दिला. 

चेन्नई सुपरकिंग्ससोबतच्या आठवणी ताज्या असल्या, तरी पुण्याकडून खेळताना वेगळी जबाबदारी असेल, आणि पुण्याकडून खेळताना मी तेवढेच प्रयत्न करीन हे सांगायलाही धोनी विसरला नाही.