मोहाली : रनिंग बिटविन द विकेट हा मॉर्डन डे क्रिकेटचा भाग आहे. त्याचा मी फिल्डरवर दबाव टाकण्यासाठी वापर करतो, असा माइंड गेम करावा लागतो, असे भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांने मॅच संपल्यावर आपले गुपीत उघड केलं.
संजय मांजरेकर याने धोनी रनिंग बिटविन द विकेटबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी धोनी म्हणाला की हा जोरात धावा काढणे हे सध्याच्या मॉडर्न डे क्रिकेटचा भाग आहे.
ज्या ठिकाणी रन नाही तिथून रन चोरून काढणे आणि एक रन आहे तिथे दोन रन्स काढायचे, असे केल्याने चांगल्या फिल्डरच्या हातून चोरटी धाव काढली तर इतर प्लेअर गर्भगळीत होता. त्याचा फायदा घेता येतो, असे धोनीने सांगितले.