मिरपूर : १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये आर्यंलडविरुद्धचा सामना भारताने ७९ धावांनी जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना ५० षटकांत २६८ धावा केल्या. यात सर्फराज खानने ७४ धावा तडकावल्या. त्याला चांगली साथ दिली ती वॉशिंग्टन सुंदरने. त्याने ६२ धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरादाखल आयर्लंडचा संपूर्ण संघ १८९ धावांत संपुष्टात आला. राहुलचे तीन बळी आणि आवेश खान आणि महिपाल लोमरोर यांनी घेतलेल्या प्रत्येकी दोन बळीच्या जोरावर भारताला त्यांचा डाव झटपट गुंडाळता आला.
या सामन्यात भारताचा कर्णधार आर.आर. पंतच्या हातून झेल निसटला. मात्र त्यानंतरही आर्यंलडचा फलंदाज बाद झाला. कसा ते पहा व्हिडीओतून
What happened next!? You will probably never guess! Extraordinary from #U19CWC today.. WATCH https://t.co/4j65LQ5G9P pic.twitter.com/xJJetSs3tF
— ICC (@ICC) January 28, 2016