आयपीएल बेटिंग प्रकरणी देशभरातील बुकींवर EDचे छापे

IPLच्या देशभरातील बुकींवर EDनं छापे मारल्याची बातमी येतेय. काल दिल्ली, बंगळुरू, जयपूर आणि देशातील अन्य भागांतील सक्रीय बुकींवर EDनं छापे मारलेत. 

PTI | Updated: May 11, 2015, 01:13 PM IST
आयपीएल बेटिंग प्रकरणी देशभरातील बुकींवर EDचे छापे

नवी दिल्ली: IPLच्या देशभरातील बुकींवर EDनं छापे मारल्याची बातमी येतेय. काल दिल्ली, बंगळुरू, जयपूर आणि देशातील अन्य भागांतील सक्रीय बुकींवर EDनं छापे मारलेत. 

शनिवारीही मंगळुरु पोलिसांनी एका क्रिकेट बेटींग रॅकेटचा पर्दाफाश करत चौघांना ताब्यात घेतलं होतं. या चौघांना आयपीएलच्या मॅचेसवर बेटींग करताना अटक करण्यात आली होती. 

पोलिसांनी त्यांच्याकडून एक कार, एक मोटार सायकल, सहा मोबाईल एक लॅपटॉप आणि ४.९० लाख रुपये असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.