गगन नारंगने पटकावले सिल्वर मेडल

Updated: Jul 28, 2014, 09:19 PM IST
गगन नारंगने पटकावले सिल्वर मेडल title=

ग्लासगो :  भारताचा स्टार शूटर गगन नारंग याने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सिल्वर मेडल पटाकावून भारताच्या मेडल संख्येत आणखी एक मेडल मिळवून दिले आहे.

गगन या मेडलमुळे भारताने आतापर्यंत २४ मेडल पटकावले आहेत. यात ७ गोल्ड, १० सिल्वर आणि ७ ब्रॉन्झ मेडल पटकावले आहेत. २४ मेडल सह भारत चौथ्या स्थानावर आहे. 

नारंगने २० शॉटमध्ये २०३.६ गुण मिळवले. तर ऑस्ट्रेलियाच्या वॉरेन पॉटेन्ट याने २०४.३ गुण मिळवून गोल्ड मेडल पटकावले.

या स्पर्धेत इंग्लडच्या केनिथ पारार याला ब्रॉन्झ मेडल मिळाले.  

यापूर्वी आज ५० मीटर एअर पिस्टर स्पर्धेत भारताच्या जीतू राय याने गोल्ड आणि गुरपाल सिंग याने सिल्वर पदक पटकावले. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.