glasgow games

गगन नारंगने पटकावले सिल्वर मेडल

ग्लासगो :  भारताचा स्टार शूटर गगन नारंग याने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सिल्वर मेडल पटाकावून भारताच्या मेडल संख्येत आणखी एक मेडल मिळवून दिले आहे.

गगन या मेडलमुळे भारताने आतापर्यंत २४ मेडल पटकावले आहेत. यात ७ गोल्ड, १० सिल्वर आणि ७ ब्रॉन्झ मेडल पटकावले आहेत. २४ मेडल सह भारत चौथ्या स्थानावर आहे. 

Jul 28, 2014, 07:27 PM IST

कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशीच भारताचं मेडल पक्क

कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशी भारताचं पहिलं मेडल निश्चित झालंय. ज्यूडोच्या 60 किलो वजनी गटात नवज्योत चानानं फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केलंय. त्यानं सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ले ग्रॅनेजवर वाझा अरी पद्धतीनं टफ बाऊटमध्ये मात केली. आता फायनलमध्येही बाजी मारून चाना भारताला पहिलं गोल्ड मेडल पटकावून देतो का? ते पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

Jul 24, 2014, 08:10 PM IST