भारत-पाकिस्तान मालिकेबाबत बीसीसीआयशी चर्चा नको

भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेविषयी बीसीसीआयबरोबर कोणतीही चर्चा करु नका, असे आदेश पाकिस्तानच्या सरकारनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिले आहेत.

Updated: May 29, 2016, 08:58 PM IST
भारत-पाकिस्तान मालिकेबाबत बीसीसीआयशी चर्चा नको title=

कराची : भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेविषयी बीसीसीआयबरोबर कोणतीही चर्चा करु नका, असे आदेश पाकिस्तानच्या सरकारनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी ही माहिती दिली आहे. 

जोपर्यंत पाकिस्तान सरकार आम्हाला नवे आदेश देत नाही तोपर्यंत या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सुरु करण्याबाबत बीसीसीआयशी कोणतीही चर्चा होणार नाही, हे शहरयार खान यांनी स्पष्ट केलं आहे. 

पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळेच नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या बैठकीमध्ये या पीसीबीनं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली नाही. अनुराग ठाकूर हे बीसीसीआयचे अध्यक्ष होणं भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या भविष्यातील चर्चेसाठी फायदेशीर असेल असंही शहरयार खान म्हणाले आहेत. 

अनुराग ठाकूर बीसीसीआय आणि सरकारचंही प्रतिनिधीत्व करतात त्यामुळे भविष्यात एका व्यक्तीबरोबर चर्चा करणं सोपं जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.