कसोटीच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्यात हरभजन नवव्या क्रमांकावर

भारत-बांग्लादेश कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंग सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नवव्या क्रमांकावर आलाय. यापूर्वी या स्थानावर असलेल्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि जलदगती गोलंदाज वसिम अक्रमलाही त्यानं मागे टाकलंय.

Updated: Jun 15, 2015, 06:08 PM IST
कसोटीच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्यात हरभजन नवव्या क्रमांकावर title=

मुंबई : भारत-बांग्लादेश कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंग सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नवव्या क्रमांकावर आलाय. यापूर्वी या स्थानावर असलेल्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि जलदगती गोलंदाज वसिम अक्रमलाही त्यानं मागे टाकलंय.

बांग्लादेशचा सलामीवीर इमरानुल केएसची विकेट घेत हरभजनच्या कसोटीमधील विकेट्सची संख्या 415 झाली आणि तो 10 व्या क्रमांकावरून 9 व्या क्रमांकावर आलाय. 9व्या स्थानावरील अकरमने 104 कसोटी सामन्यांमध्ये 414 विकेट्स घेतल्या होत्या, तर भज्जीने 102 कसोटीमध्ये 415 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत स्पिनरच आघाडीवर आहेत.

या यादीत पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आहे. ज्यानं 133 कसोटी सामन्यांमध्ये 800 विकेट्स  तर दुसऱ्या क्रमांकावरील शेन वॉर्ननं 145 सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्यात. 132 सामन्यांमध्ये 619 विकेट्स घेत भारतीय लेग स्पिनर अनिल कुंबळे तिसऱ्या स्थानावर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.