जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू व्हायचंय - कोहली

भारतीय क्रिकेट टीमचा उप कॅप्टन आणि वर्ल्डकपमध्ये टीम आणि प्रेक्षकांची सर्वात मोठी आशा झालेल्या विराटनं नुकताच एक खुलासा केलीय. विराट म्हणतो, मला जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समनमध्ये स्वत:चं नाव सहभागी करून घ्यायचंय.

Updated: Mar 26, 2015, 01:30 PM IST
जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू व्हायचंय - कोहली title=

सिडनी: भारतीय क्रिकेट टीमचा उप कॅप्टन आणि वर्ल्डकपमध्ये टीम आणि प्रेक्षकांची सर्वात मोठी आशा झालेल्या विराटनं नुकताच एक खुलासा केलीय. विराट म्हणतो, मला जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समनमध्ये स्वत:चं नाव सहभागी करून घ्यायचंय.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)च्या वेबसाइटनुसार कोहलीनं सांगितलंय, 'मला वर्ल्डकप २०११'पासून मोठी प्रेरणा मिळालीय. मी केवळ २२ वर्षाचा असतांना विश्व चॅम्पियन बनलो होतो. मला त्यावेळी स्वत:ला चॅम्पियन बनण्याचा आनंद निट उपभोगता आला नाही. मात्र जेव्हा मी सीनिअर खेळाडूंचा जोश पाहिला तर मला वर्ल्डकप ट्रॉफीचं महत्त्व कळलं. त्या दिवसानंतर किंवा त्यापूर्वीपासूनच मी जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू बनू इच्छितो.'

कोहली म्हणतो, 'मला नेहमीच असा खेळाडू व्हायची इच्छा आहे ज्याचं करिअर संपल्यानंतर आठवलं जाईल. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणनं अनेक वर्ष जशी क्रिकेट खेळली, तशी उपलब्धी मला पण मिळवायची आहे. म्हणून अनेक वेळा मी स्वत:ला प्रश्न विचारतो मी त्यांच्यासारखा का बनू शकत नाही.'

महेंद्र सिंह धोनी द्वारे अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर कोहली म्हणतो, 'मी याची कल्पना सुद्धा केली नव्हती की धोनी याप्रकारे सीरिजदरम्यानच निवृत्तीघेऊन कॅप्टनसी मला देईल. ही माझ्यासाठी आश्चर्य आणि भावूक करणारा निर्णय होता. बातमी मिळताच मी हॉटेलमध्ये परतून आपल्या खोलीत येऊन रडलो.'

कोहलीनुसार ज्या कॅप्टननं माझ्यासारख्या तरूण खेळाडूंना प्रोत्साहन दिलं त्याच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय खूप उदास करणारा होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x